ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं!

मुंबई : (Legislative Assembly Monsoon session postponed) महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होतं. मात्र, हे होत असलेले अधिवेशन पुढं ढकलण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने अधिकृत पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. अधिवेशन पुढं ढकलण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. अधिवेशनाची नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षापासून करोनामुळं नागपूर हिवाळी अधिवेशन झालेलं नाही. त्यामुळं आगामी पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे, अशी मागणी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत बोलताना केली होती. या मागणीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समर्थन करीत नव्या सरकारनं याकडं लक्ष देऊन पावसाळी व हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे, असं म्हटलं आहे.

विदर्भातील कामगारांचे प्रश्न, उद्योगधंदे, बेरोजगारी, कृषी, शेतकरी आत्महत्या, रस्त्यांची दुरवस्था, अवकाळी पावसाने झालेली पिकांचे नुकसान, सिंचन, पर्यटन, उद्योग गुंतवणूक, सर्वांगीण विकास, विदर्भातील असे अनेक प्रश्न प्रलंबित असून यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला फार महत्त्व आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये