शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी होणार विस्तार!

मुंबई : (expand the Shinde government’s cabinet) मागच्या महिनाभरातील घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उडथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंडखोरी केल्यामुळं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंनी 40 शिवसेना बंडखोर आमदारांसह भाजपच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून दि. 30 जुन रोजी शपथ घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन १७ दिवस पुर्ण होत आहेत. पंरतू आद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यावर बोट दाखवत विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे.
सुत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून पहिल्या टप्प्यात 10 ते 12 मंत्र्यांना मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. 25 जुलैपासून राज्यात पावसाळी अधिवेशन आहे. त्यापूर्वी या दहा ते 12 मंत्र्यांना राज्याच्या कारभाराची आणि प्रश्नांची माहिती व्हावी. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 19 जुलैपर्यंत दिल्लीमधून सर्व बोलणी होतील. त्यानंतर 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.