“हा रोल जरा…”, आलियाच्या प्रेग्नेंसीवर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया

मुंबई | काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने गरोदर असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. रणबीर कपूरबरोबर आलिया भट्ट लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. याच दरम्यान आलिया भट्टचे वडील आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी आलियाच्या गरोदरपणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘सास, बहू और बेटिया’ या कार्यक्रमात आलियाच्या गरोदरपणावर प्रतिक्रिया दिली, यावेळी ते म्हणाले, “आलिया भट्ट माझी मुलगी, आई होणार आहे. आजोबाचा रोल करणं माझ्यासाठी अवघड राहील”.
महेश भट्ट मुलगी आलिया भट्टसाठी खूपच आनंदीत आहेत. आलियानं नुकतंच रणबीर कपूरबरोबर आपल्या गरोदर असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले, की दोघेही लवकरच आईबाबा बनणार आहेत. ‘सास, बहू और बेटिया’ कार्यक्रमात महेश भट्ट म्हणतात, धन्यवाद हा असा रोल आहे, जो करण्यासाठी थोडा अवघड असेल. याबरोबर त्यांनी आलियाविषयी अभिमान व्यक्त करत आपल्या यशाविषयी सांगितले.
दरम्यान, आलिया भट्टने सोशल मीडियावर दोन छायाचित्रे पोस्ट केली होती. त्याच्या माध्यमातून आलियाने आई होण्याची आनंदाची बातमी दिली होती. तसंच आलिया आणि रणबीरने वर्ष 2017 पासून डेट करण्यास सुरुवात केली होती. चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर त्यांचे प्रेम वाढू लागले. आलिया आणि रणबीर या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या बाॅलीवूड जोडप्याचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.