आशियाई डान्स स्केट स्पर्धेत पुण्याच्या डान्सरची नेत्रदीपक कामगिरी

पुणे : बिराटनगर, नेपाळ ह्या ठिकाणी पार पडलेल्या १ ल्या अशियाई डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या पुण्याच्या ६ स्केटिंग डान्स खेळाडूंंनी नेत्रदीपक कामगिरी करीत ८ सुवर्ण व १ रौप्य पदक जिंकून भारताचे नाव उंचावले.
आशियाई स्तरावरील डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धेकरिता आशियाई देशातील भारता, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान ह्या देशांचे स्पर्धक सहभागी झाले होते. १ ल्या अशियाई डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धेचे आयोजन वर्ल्ड डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन, डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन ऑफ एशिया, डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन ऑफ नेपाळ ह्यानी केले होते.
भारतातर्फे पुण्याच्या ६ खेलाडू ज्यानी ह्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केले ते पुढील प्रमाणे आहेत. सत्कार समारंभ माईन्ड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, ब्रिगेडियर सुनिल लिमये (निवृत्त), प्रविण मेकँजी. क्रीडा भारतीचे पुणे शहर अध्यक्ष शैलेश आपटे, (जनरल सेक्रेटरी वाय एम सी ए, पुणे), श्री. संतोष मर्डेकर (आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर ) या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.