अर्थताज्या बातम्यामहाराष्ट्र

लस्सीसह ‘या’ वस्तूंवरील जीएसटी घेतला मागे; निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली | Central Government Has Withdrawn GST – सध्या राज्यात महागाईनं सामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. अशातच केंद्र सरकारनं ज्या गोष्टी जीएसटीच्या कक्षेत नव्हत्या त्या गोष्टींवर देखील जीएसटी आकारायला सुरवात केली होती. तसंच ज्या वस्तूंवर आधी जीएसटी होता, त्यात वाढ केली होती. यावरुन संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी गदारोळ माजविला आहे. जनतेत प्रचंड रोष निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे अखेर केंद्र सरकारनं माघार घेतली आहे.

केंद्र सरकारनं धान्यावर देखील पाच टक्के जीएसटी आकारला होता. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत हा जीएसटी मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर आणि 25 किलो वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या पदार्थांवर 5% जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी 18 जुलै पासून झाली होती. मात्र आता केंद्र सरकारनं खुल्या धान्यावरील जीएसटी मागे घेऊन सामान्य जनतेला दिलासा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये