ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

2021 लाच शिवसेनेची पवारांना धक्का देण्याची तयारी पण… राहूल शेवाळेंचा मेगा गौप्यस्फोट

मुंबई : (Rahul Shevale On pres Conference secret explosion) मंगळवार दि. 19 रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेनेच्या १२ खासदारांच्या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे यांनी असा मेगा गौप्यस्फोट केला आहे, ज्यामुळे कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही हादरा बसला असावा. कारण, जून २०२१ मध्ये उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले आणि त्यांनी पुन्हा युती करण्याबाबतची चर्चाही केली, असा गौप्यस्फोटच खासदार राहुल शेवाळेंनी केला.

जून २०२१ रोजी मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे हे अशोक चव्हाण आणि अजित पवार यांना घेऊन आपल्या शिष्टमंडळासह दिल्ली दौऱ्यावर आले होते. यातच त्यांनी मोदींसह बंद दाराआड चर्चा केली आणि युतीची तयारी सुरू झाली. शिवसेनेतली धुसफूस २१ जून २०२२ ला एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे समोर आली असंच उभ्या महाराष्ट्राला वाटलं. पण त्यापूर्वीच म्हणजे एक वर्षापूर्वी शिवसेनेतल्या धुसफुसीला सुरुवात झाली होती असं शेवाळे म्हणाले.

पण, त्याच महिनाभरात राज्यात ५ जुलै २०२१ रोजी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर विधानसभेत चर्चा सुरू असताना राजदंड पळविणे, माईक खेचणे, अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरून गैरवर्तन करणे यासाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. एकीकडे युतीची बोलणी आणि दुसरीकडे सेनेच्या भास्कर जाधव यांच्याकडून भाजप आमदारांवर कारवाई यामुळे भाजप नेतृत्त्व नाराज झालं आणि इथेच युती होण्याची शक्यता धुसर झाली यासारखे अनेक गौप्यस्फोट शेवाळेंनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये