“शिवसेना सोडायची तर मर्दासारखी सोडा, पवारांच्या नावे खडे फोडू नका”

कोल्हापूर- Jayant Patil talk pn Sharad Pawar – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये जाणं महागात पडलं आहे. शिवसेनेमधील मातब्बर नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करत सेनेचे नेते शिंदंकडे जात आहेत. रामदास कदम यांनी शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यावर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कदमांना प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना सोडायची तर मर्दासारखी सोडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने खडे फोडू नका, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्रात चालणार नाही. जनतेलाही माहितेय की तुम्ही कुठे चाललात आणि शरद पवार कुठे ठामपणे उभे असल्याचंही पाटील म्हणाले. कोल्हापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे तुम्ही सगळ्यांनी राहणं अपेक्षित होतं, पण उभं कोण आहे तर शरद पवार, तेही ठामपणे उभे असल्याचं पाटील यांवी सांगितलं.