पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

तीस मीटर खोलीवर असणार स्टेशन

पुण्याची भुयारी मेट्रो

पुणे : पुण्याची जशी सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे, तशी आता मेट्रो सिटी म्हणूनसुद्धा ओळख होणार आहे. यामध्ये विशेष अशी भुयारी मेट्रो पुण्यामध्ये तयार होते आहे. या भुयारी मेट्रोचे काम आता प्रगतिपथावर आलेले आहे. शिवाजीनगर आणि सिविल कोड असे मेट्रोचे दोन स्टेशन्स आहेत. ज्यामध्ये सहा किलोमीटरचे टप्पे आहेत.

एकूण बारा किलोमीटरची ही मेट्रो आहे. त्यामध्ये सिविल कोर्स स्टेशन, हेज स्टेशन आहे. ते अत्याधुनिक असणार आहे. सिविल कोर्ट स्टेशनमध्ये ज्यावेळेस मेट्रो येईल त्यावेळेस प्रवाशांना पाच टप्पे वर चढून यावं लागेल, त्याच्यासाठी इलेव्हेटेड लिफ्टची सोय आणि शिड्यांचीसुद्धा सोय मेट्रोतर्फे करण्यात येणार आहे. एक मेट्रो स्वारगेटला येईल, ती याच स्टेशनवर क्रॉस होऊन परत जाईल तीच दुसरी पिंपरी चिंचवड वरून मेट्रो येईल व तीसुद्धा याच ठिकाणी क्रॉस होऊन परत जाणार आहे. त्यामुळे हे स्टेशन एक टर्मिनस असणार आहे. तर भुयारामध्ये जवळपास ३० मीटर खाली खोल एक मोठा ऐतिहासिक स्टेशन होणार आहे. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी कॅफे एरिया असेल. प्रवाशांसाठी लागणारा जो मोकळा फेस लागतो तो उपलब्ध करून देता येईल. रेल्वे मेट्रो तर्फे विविध सुविधा प्रवाशांना देणे अपेक्षित आहे, त्या सगळ्या सुविधांची व्यवस्था स्टेशनमध्ये असेल व एक ऐतिहासिक स्टेशन पुणेकरांसाठी असणार आहे.

पुण्याच्या इतिहासासाठी यांची नोंद होईल अशी अपेक्षा पुणेकरांना आहे. आता रोलिंग टाकण्याचे काम हे चालू आहे. प्रशासकीय अधिकारी जैन यांनी सांगितले आहे की, या स्टेशनचे जवळपास ५०-६० टक्के काम पूर्ण झालेले आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व सुरक्षित काळजी घेऊन हे स्टेशन लवकरच पुणेकरांच्या सेवेमध्ये आणण्याचा त्यांचा मानस आहे . तर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये