पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

नडगम अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला

पुणे : घोरपडी गाव मॅरेज हॉलमध्ये यशवंतभाऊ नडगम यांचा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. त्यावेळी भाऊंनी दलित पँथरच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आर.पी.आय. आठवले गटाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच भाऊंचे चाहते यांना भाऊंनी त्यांचा आतापर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास व्यक्त केला, तसेच महापुरुषांचे व पँथरचा इतिहास सांगून कार्यकर्ताच्या मनामध्ये प्रेरणा, ऊर्जा, चेतना व संघर्षाची ज्योत पेटवली. तसेच येणार्‍या काळामध्ये व वाढत्या अन्याय, अत्याचारामुळे पँथरची खरंच गरज आहे असे भाऊंनी त्यांच्या शब्दातून व्यक्त केले.

अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले मान्यवर आरपीआय (आ) पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नीलेशभाऊ आल्हाट, ज्येष्ठ नेते आशीत गांगुर्डे, इतर मान्यवर तसेच दलित पँथरचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्रीकांत लोणारे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष संतोषभाऊ गायकवाड, मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रताप रावत, पुणे शहर अध्यक्ष सनी पंजाबी, पुणे शहर उपाध्यक्ष अमोल पाटोळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष स्नेहा माने, सातारा जिल्हाध्यक्ष अमोल पवार, सोलापूर जिल्हाध्यक्ष बंडू गवळी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रवी जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आकाश पायाळ, इंदापूर तालुकाध्यक्ष लखन मिसाळ, पंचशील वेल्फेअरचे संस्थापक अध्यक्ष इरान्ना नडगम, इ. तसेच इतर मान्यवर. प्रभाग क्रमांक २१ मधून इच्छुक उमेदवार सुवर्णाताई नडगम यांनी कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सर्व आयोजन अनमोल नडगम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये