ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

ओबीसी आरक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : (OBC Reservation In First Statement Sharad Pawar) बुधवार दि. 20 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला बांठिया आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिली आहे. तसचं राज्यात आगामी निवडणुका घोषित करण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणानाची लढई जिंकल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत, न्यायालयाच्या या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो, असं म्हटलं आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळं आगामी निवडणूकांत ओबीसी समाजातील उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच मविआ सरकारच्या प्रयत्नांची आठवण करून देत पवारांनी ट्वीट केलं की ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने आज जिंकली याचे समाधान वाटते.

हे आरक्षण टिकावं यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वानं प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज त्याचा परिणाम या निर्णयात दिसली, असंही त्यांनी म्हटलं आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये