…अन् तेव्हाच बंडखोरांनी डाव साधला; आदित्य ठाकरेंचा घणाघात!
![...अन् तेव्हाच बंडखोरांनी डाव साधला; आदित्य ठाकरेंचा घणाघात! Aditya Thackeray 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/Aditya-Thackeray-2.jpg)
मुंबई : (Adity Thackeray On comments Eknath Shinde) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्यावर एका आठवड्यात एक नाही तर, दोन शस्त्रक्रिया झाल्या. मुख्यमंत्री शस्त्रक्रियेनंतर बेडवरून हलू शकत नाहीत, ही माहिती ज्या मिनिटाला कळाली तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री होऊ शकतो का, याची चाचपणी सुरु केली. आपल्यासोबत कोण येईल किंवा नाही, यादृष्टीने त्यांनी आमदारांची जमवाजमव सुरु केली. या गद्दारांची ही माणसुकी आहे, अशा घणाघाती शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर बुधवारी भिवंडीतील सभेत बोलताना केला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. गद्दारांची माणुसकी तर बघा, त्यांनी जमवाजमव कधी सुरु केली तर आपले मुख्यमंत्री रुग्णालायत गेले तेव्हा. बंडखोर आमदार आरोप करतात की, उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नव्हते, ही गोष्ट खरी आहे. मुख्यमंत्री शस्त्रक्रियेनंतर दोन महिने कोणालाच भेटले नाहीत. पण ते फोनवरून सर्व कामं करत होते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
महिनाभरापासून दुःखदायक वातावरण शिवसेनेच्या राजकीय जीवनात निर्माण झाले आहेत. हे विसरण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे तुम्हाला शिवसैनिकांना भेटण्यासाठी ही यात्रा काढली आहे. ज्यांना आपण पुढं आणलं, ओळख दिली, मंत्रिपदं दिली. पण ते आपल्याला सोडून गेले, गद्दारी केली, हे तुम्हाला तरी पटणारं आहे का? जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते राजकारण म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी युवा पिढीला यावेळी केला आहे.