ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

लोकसभा अधिवेशनात गोंधळ! चार कॉंग्रेस खासदार निलंबित

नवी दिल्ली – Lok Sabha Monsoon Session : लोकसभेच्या सभागृहात निदर्शने करून कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित कॉंग्रेस खासदार महागाईविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करत होते. सभापती ओम बिर्ला यांनी यासंबंधित कारवाई केली.

फलक घेऊन निदर्शने करणाऱ्या कॉंग्रेसच्या खासदारांना सभापतींकडून गोंधळ आणि निदर्शने न करण्याचा इशारा देखील दिला होता. आंदोलन करणाऱ्यांनी सभागृहाच्या बाहेर जाऊन आंदोलन करावं असं सभापतींकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्यामुळं त्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

मणिकम टागोर, जोथिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन असं निंबित करण्यात आलेल्या खासदारांची नावे आहेत. निलंबनानंतर या खासदारांनी सभागृहाच्या बाहेर थांबून जोरजोरात घोषणाबाजी केली. कारवाई नंतर सभापतींकडून अधिवेशनाला उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे.

निलंबनावर प्रतिक्रिया देताना, कॉंग्रेसकडून सत्ताधारी पक्षावर आरोप करण्यात येत आहेत. “आमच्या खासदारांना निलंबित करून सरकार आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.” अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस कडून देण्यात आली आहे.

विरोधी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन महागाई, वाढलेल्या तेलाच्या किमती आणि जीएसटी वर बोलावं अशी मागणी अधिवेशन सुरु झाल्यापासून केली जात आहे. १८ जुलै पासून पाऊसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये