ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी महादेव जानकरांचे दिल्लीत आंदोलन!

पुणे : शुक्रवार दि. 29 जुलै रोजी पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी रासप पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी दिनांक 5 आॅगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आ. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर- मंतर मैदानावर जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी संपूर्ण देश पातळीवरील ओबीसी समाज एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या परिषदेत त्यांनी 1) जातनिहाय जनगणना करणे, 2) ओबीसी आरक्षण कायम करणे, 3) नॉन-क्रिमीलिअरची अट रद्द करणे, 4) 50 टक्के सिलींग हटविणे, 5) सार्वजनिक संस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, 6) न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, 7) शेती, धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी देणे, 8) महागाई थांबविण्यासाठी ठोस पाऊल उचलणे, 9) संपुर्ण शिक्षण मोफत करणे, 10) मोफत अरोग्य सुविधा पुरविणे. अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेला बालाजी दादा पवार (शहर अध्यक्ष), पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सचिन गुरव, कविता जावळे (महिला जिल्हा अध्यक्षा), प्रसाद कोळेकर, राजेश लवटे (सचिव), वैजनाथ स्वामी (संपर्क प्रमुख), नारायण यमगर (संघटक), बिरुदेव अनुसे (मीडिया प्रमुख), तुषार तामखेडे (वॉर्ड अध्यक्ष) उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये