Top 5देश - विदेशरणधुमाळी

महागाई-जीएसटी विरोधात कॉंग्रेस आक्रमक; देशव्यापी करणार आंदोलन

नवी दिल्ली – Congress On Strike Against Inflation : देशातील वाढती महागाई आणि जीएसटी च्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष कॉंग्रेसने भाजपला धारेवर धरलेले आहे. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून महागाईवर बोलण्याची कॉंग्रेसकडून सरकारला मागणी केली जात आहे. सभागृहात दररोज पोस्टरबाजी आणि घोषणाबाजी देखील केली जात आहे. दरम्यान, सभागृहात गोंधळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना अधिवेशनातून निलंबित देखील करण्यात आले आहे.

आता मात्र कॉंग्रेस महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून आक्रमक होत असल्याचं दिसत आहे. महागाई, जीएसटी, बेरोजगारीच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून देशव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. सोमवारी सकाळी कॉंग्रेसकडून आंदोलनासंबंधीत बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी ५ ऑगस्टला देशभर आंदोलन करण्याची योजना कॉंग्रेसकडून आखण्यात आली आहे. शुक्रवारी कॉंग्रेसचे सर्व खासदार संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढणार असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान भावनाला घेराव घालणार

आंदोलनादरम्यान कॉंग्रेसकडून राष्ट्रपती भवनासमोर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर पंतप्रधान भावनालाही कॉंग्रेस घेराव घालणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीविरोधात काम करत आहेत. आम्ही शेवटपर्यंत लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष करणार. लोकांच्या समस्यांवर सरकार विरोधात आम्ही आंदोलन करणार. सरकारला जे करायचे ते त्यांनी करावे’ असा इशारा राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये