“एका सच्च्या माणसाची भूमिका केल्याचं…”, प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत!
मुंबई | Prasad Oak’s Post In Discussion – मराठी प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. तसंच या चित्रपटामुळे प्रसाद चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका प्रचंड गाजली. अशातच प्रसादने आता एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने ‘धर्मवीर’ चित्रपटातील भूमिकेसाठी आणखी एक पुरस्कार मिळाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. प्रसादने हा पुरस्कार स्वीकारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “‘धर्मवीर’चा तिसरा पुरस्कार…”माझा पुरस्कार”, एका सच्च्या माणसाची भूमिका केल्याचं कौतुक एका सच्च्या माणसाकडून…!!! धन्यवाद मुळये काका…धन्यवाद टीम धर्मवीर”
दरम्यान, प्रसाद ओकने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तसंच त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. यामध्ये आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यासारख्या अनेक कलाकारांनी प्रसादचं अभिनंदन केलं आहे.