..तर आज विनायक मेटेंचा जीव वाचला असता!

बीड : (Death of Vinayak Mete) रविवार, दि. १४ ऑगस्ट रोजी पहाटे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंबंधित होणाऱ्या बैठकीसाठी ते उपस्थित राहण्यासाठी मेटे हे रात्री मुंबईकडे जात होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांचा अपघात झाला.
दरम्यान, झालेल्या आपघातानंतर मेटे तात्काळ उपचाराची अवश्यकाता असताना त्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. या अपघातात मेटेंच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
भाजप नेते गणेश नाईक यांनी याबाबत प्रतिक्रिया देत पुणे ते नवी मुंबईपर्यंत एक्सप्रेसवेवर तीन ते चार ठिकाणी ट्रॅामा सेंटर लवकरात लवकर उभे करावेत, अशी मागणी केली आहे. महामार्गावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्या असत्या, किंवा एखादे ट्रॉमा सेंटर असले असते तर कदाचित मेटे यांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया सर्वस्तरातून येत आहे.