ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

विनायक मेटेंच्या पार्थिवावर ‘या’ ठिकाणी होणार अंत्यसंस्कार!

बीड : (Death of Vinayak Mete) रविवार, दि. १४ ऑगस्ट रोजी पहाटे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, आज विनायक मेटे यांचे पार्थीव मुंबईतील त्यांच्या वडाळा येथिल भक्तीपार्क या त्यांच्या घरी नेले जाणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी शिवसंग्रामचे कार्यकर्ते तसेच अन्य नेते जमत आहेत. आज संध्याकाळपर्यंत विमानाने विनायकराव मेटे यांचे पार्थीव बीड येणार आहे.

उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत मेटे यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवन या ठिकाणी ठेवण्यात येईल. दुपारी साडे तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यविधीसाठी महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते येणार आहेत, अशी माहिती शिवसंग्रमाच्या कार्यकर्त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये