ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

बोस्टनमध्ये दुमदुमला भारतमातेचा जयघोष

पुणे : देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असताना अमेरिकेतील बोस्टनमध्येही तिरंगा फडकला. तेथे स्थायिक भारतीय कुटुंबांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

अल्बानी ढोल ताशापथक (अल्बानी, न्यूयॉर्क) आणि संकल्प मराठी मंडळ (बोस्टन) यांनी बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले. बोस्टन शहरावर अमेरिका-भारताचा ध्वज असलेले २२० फुटी विमान, बोस्टन हार्बर येथे ध्वजारोहण, बँडपथकासह मिरवणूक आणि भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे फ्लोट यांचा समावेश होता. या एकूण १५ फ्लोट्समध्ये एक महाराष्ट्र फ्लोट होता. प्रत्येक फ्लोटने भारतातील विविध राज्यांतील वैविध्य दाखवले. त्यातील सहभागींनी महान ऐतिहासिक शासक, स्वातंत्र्यसैनिक आणि विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. महाराष्ट्राच्या फ्लोटमध्ये महाराष्ट्रीय कुटुंब आणि विद्यार्थी सहभागी झाले. या फ्लोटद्वारे छत्रपती शिवाजीमहाराज, राजमाता जिजाबाई आणि स्वराज्याच्या मावळ्यांचे दर्शन घडविण्यात आले.

‘एक संकल्प मराठी जपण्याचा’ हे अल्बानी ढोलताशा पथकाचे घोषवाक्य आहे. मानवी इतिहासात छत्रपती शिवरायांसारखा शूर, धाडसी राजा झाला नाही. रयतेच्या स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या या विश्ववंदनीय राजाला बोस्टन-अमेरिका येथे भव्य रथातून जिवंत देखाव्याद्वारे मानवंदना देण्याची संधी मिळत असल्याबद्दल मनात खूप आनंद आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सातासुमद्रापार जपताना खूप अभिमान वाटतो.

_कल्याण घुले, संस्थापक अध्यक्ष, अल्बानी ढोलताशा पथक, न्यूयार्क

महाराष्ट्राच्या फ्लोटचे श्रेय अल्बानी ढोल-ताशापथक (अल्बानी, न्यूयॉर्क) आणि संकल्प मराठी मंडळ (बोस्टन) या दोन संस्थांच्या १५० सदस्यांच्या टीमला जाते. या दोन्ही संस्था उत्तर अमेरिकेतील महाराष्ट्रीय कुटुंबांना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी उद्देशाने एकत्र आणत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये