“फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू”, शेलारांची मेळाव्यात डायलॉगबाजी!

मुंबई : (Ashish Shelar On Devendra Fadnavis) आज मुंबई महापालिकेच्या प्रचाराच्या आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू, असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमात टोल, रस्ते, खड्डे आणि विकास कामांवरुन शेलारांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबई अध्यक्षपदावरुन झालेल्या टीकेला देखील शेलारांनी या कार्यक्रमात उत्तर दिलं. मुंबईतील समस्यांची जाण असल्यानेच अध्यक्षपदी निवड झाल्याचे शेलार यावेळी म्हणाले. शिवसेनेने मुंबईला भ्रष्टाचार दिला, असा घणाघातही शेलार यांनी यावेळी केला.
ते म्हणाले, अमिताभ बच्चन यांचा तो खराच डायलाॅग आठवला तो देवेंद्रजींवर अतिशय चक्कल आलय, आणि तो आपल्याही माहितीय तो असाय जहाॅं हम खडे होते है, लाईन वही से शुरु होती है, म्हणून देवेंद्रची आपण कोणाच्या मनात नवता असा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट तुम्ही बदलला, असे म्हणत शेलारांनी त्यांचे कौतूक केले. मुंबईच्या पालिकेच्या प्रचारचा नारळ आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फोडण्यात आले.