आता तुम्हाला ‘चित्ता सरकार’ म्हणायचं का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल!

मुंबई : (Uddhav Thackeray On Narendra Modi) अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चित्ता सरकार म्हणायचं का? असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मोदी आणि भाजप नेत्यांना खोचक टोला लगावला आहे.
भारतात 70 वर्षांनी चित्ता भारतात आणण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. सत्तर वर्षानंतर भारतात प्रथमच चित्ता आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंनी, प्रताप सरनाईक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सरनाईक यांची केस लोकशाहीपेक्षाही मोठी आहे. मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे. प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. बेंबीच्या देटापासून उर बडवणारे किरीट सोमय्या यांची देखील सध्या चिडीचूप दिसून येत आहे.