“विरोधक तर असला पाहिजे अन् तोही दिलदार असला पाहिजे”

पुणे | Supriya Sule On CM Eknath Shinde – खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज (20 सप्टेंबर) मतदार संघातील प्रश्नाबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामधील दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार साहेब (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, मुख्यमंत्री हे पद खुप मोठं असतं. हे पद सर्वसमावेशक असलं पाहिजे. तसंच आमच्या काळात देखील दसरा मेळावा होत होता. त्यावेळी आमच्या विरोधात त्या व्यासपीठावरून दिलदारपणे भाषणं होत असायची. आम्ही देखील भाषण उत्सुकतेनं लाईव्ह पाहत असायचो की, आपल्या विरोधात काय बोलले आहेत. त्यामुळे मोठा नेता असतो ना तो नुसत्या पदाने मोठा होत नाही ,तो कर्तुत्ववाने मोठा होतो. राजा किंवा कुठलाही मोठा माणूस हा दिलदार असला पाहिजे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. तसंच पुढे त्या म्हणाल्या, हे दुर्दैव असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यावेळी देखील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) दिलदारपणे पवार साहेबांवर टीका करायचे आणि याला तर खरी गंमत म्हणतात पण विरोधक तर असला पाहिजे आणि तोही दिलदार असला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अमेठी जिंकली, आता बारामती जिकू असं विधान भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी केलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझं आयुष्य अतिशय पारदर्शक असून मी मागील 13 वर्षांपासून बारामती लोकसभा मतदार संघाचं लोकप्रतिनिधित्व करीत आहे. माझं फेसबुक, ट्विटर हे कोणी थोडासा वेळ काढून पाहिलं तर समजेल माझ्या कामाचा वेग, देशातील अनेक जण मला फॉलो करतात अशा शब्दात त्यांनी राम शिंदेंना टोला लगावला.