ताज्या बातम्यारणधुमाळी

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मुंबई | Sanjay Raut – पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Land Scam Case) प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर (Sanjay Raut Bail) सुनावणी होणार आहे.

आज (21 सप्टेंबर) संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे संजय राऊतांना कोर्टात पोहचण्यास उशिर झाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात संजय राऊतांना तब्बल दीड तास उशिरानं हजर करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच संजय राऊतांच्या जामीन अर्जवारील सुनावणी 27 सप्टेंबरला घेण्याचं कोर्टाकडून निश्चित करण्यात आलं होतं. कोर्टानं राऊतांना सुनावणीला हजर होण्यासाठी लागलेल्या विलंबाचीही नोंद घेतली आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत 19 सप्टेंबर रोजी एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून राऊतांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली आहे. आता संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये