Top 5क्राईमपुणेमहाराष्ट्ररणधुमाळी
खासदार सुळेंचा फोटो ट्विट केल्याप्रकरणी ‘युवक राष्ट्रवादी’ची पोलिसांत तक्रार
पुणे : येथील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांनी शिंदे गटातील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला खोटा फोटो प्रसिद्ध केल्याचे या वेळी गुरुनानी यांनी सांगितले.
त्यांनी पुरावा म्हणून फोटोची मूळ प्रत, तसेच म्हात्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या खोट्या फोटोची प्रत पोलिसांकडे सुपूर्त केली, तसेच म्हात्रे यांच्यावर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्याकडे दिले.