ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सरकारमध्ये माझ्या सोबत अनुभवी देवेंद्र फडणवीस, शिंदेंची अप्रत्यक्ष कबुली?

मुंबई : (Eknath Shinde On Devendra Fadnavis) “आता माझ्यासोबत पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे आता तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, माथाडी कामगारांच्या घरांना प्रोत्साहन देणार असून सिडको घरांसाठी मदत करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईत माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, यानंतर त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी स्वःताला अनुभव नाही अशी कबुली तर दिली नाही ना? आणि आपल्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरस आहेत असं तर त्यांना म्हणायचे नाही ना असे एक ना दोन प्रश्न त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित झाले आहे. अगोदरच विरोधक शिंदेंवर मुख्यमंत्री म्हणून कोण करत हे राज्याला माहित आहे असे सांगत असताना आणि आता हे वक्तव्य त्यामुळे शिंदेंनी विरोधकांना टिका करण्यासाठी आयते कोलीत दिलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माथाडी कामगारांच्या मागे उभे आहोत. रोजगार, कारखाने याबद्दल आम्ही धोरणात्मक निर्णय घेतोय हे सरकार सर्वसामान्यांचे, कामगारांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे. दोन-अडीच महिन्याचे सरकार आणि महाविकास आघाडीचे अडीच वर्षाचे सरकार यामध्ये फरक आहे, असंही ते म्हणाले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये