देश - विदेशराष्ट्रसंचार कनेक्ट

नासाचे स्पेसक्राफ्ट लघुग्रहाशी धडकले

पृथ्वीला वाचवण्याची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : नासाने मंगळवारी इतिहास रचला आहे. नासाचे अंतराळ यान अंतराळात पृथ्वीपासून ११ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या डायमॉर्फस नावाच्या लघुग्रहाशी धडकले. नासाने प्रथमच प्लॅनेटरी डिफेन्स टेस्ट मिशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. आता भविष्यात पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे लघुग्रह आदळण्याची शक्यता निर्माण झाली तर हे तंत्रज्ञान पृथ्वीला वाचवू शकते.

२७ सप्टेंबर रोजी सकाळी ४.४५ मिनिटांनी डार्ट मिशनची एका लघुग्रहाशी टक्कर झाली आहे. टक्कर झाल्यानंतर डायमॉर्फस कोणत्या दिशेने वळले याची माहिती नासाकडून अद्याप मिळालेली नाही. त्याचा डेटा मिळण्यास वेळ लागेल असे नासाचे म्हणणे आहे. यामागचा उद्देश तो लघुग्रह नष्ट करणे हा नसून त्याची कक्षा बदलणे हा आहे.

त्याच वेळी, डिडिमॉस सूर्याभोवती फिरतो. हे सूर्यापासून सुमारे १५० दशलक्ष-३० दशलक्ष किलोमीटर दूर आहे आणि २ वर्षे आणि १ महिन्यात एक फेरी पूर्ण करते. नासाचे अंतराळ यान छोट्या लघुग्रहाशी म्हणजेच डायमॉर्फसशी धडकले आहे.
ग्रीक भाषेत डिडीमॉसचा अर्थ जुळे आणि डायमॉर्फस म्हणजे ‘दोन रूपे.’ डिडिमॉस लघुग्रह १९९६ मध्ये जो मॉन्टानी यांनी शोधला होता, तर डायमॉर्फसचा शोध २००३ मध्ये पेट्र प्रवेस यांनी लावला होता. अंतराळयानाचे नेव्हिगेशन अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, ते शेवटच्या ५० मिनिटांत लहान लघुग्रह डिमॉर्फसला धडकेल, दोन लघुग्रहांमधील फरक ओळखेल, असे नासाने सांगितले. दरम्यान, नासाचे म्हणणे आहे, की अंतराळ यानाचे नेव्हिगेशन अशा प्रकारे डिझाइन केले आहे, की ते शेवटच्या ५० मिनिटांत त्याने दोन लघुग्रहांमधील फरक ओळखून ते डायमॉर्फस या छोट्या लघुग्रहावर आढळले.

डायमाॅर्फस ५३५ फूट आकाराचा लघुग्रह…

डायमॉर्फस बायनरी स्टिरॉइड प्रणालीचा भाग आहे. यात प्रणालीमध्ये दोन लघुग्रह असतात, ज्यामध्ये एक लहान लघुग्रह मोठ्या लघुग्रहाभोवती फिरत असतो. डायमॉर्फस हा १६३ मीटर रुंद म्हणजेच ५३५ फूट आकाराचा लघुग्रह आहे. त्याच वेळी, डिडिमॉस ७८० मीटर म्हणजे सुमारे २५६० फूट लांब लघुग्रह आहे. डायमॉर्फस हा मूनलेट किंवा ‘लिटल मून’ लघुग्रह आहे, जो डिडिमॉस नावाच्या मोठ्या लघुग्रहाभोवती फिरतो. डायमॉर्फस आणि डिडमॉसमधील अंतर फक्त १.२ किमी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये