“दसरा मेळाव्याला आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही, गरूड जशी पाहिजे तशी झेप घेतो”

मुंबई | Neelam Gorhe On Shinde Group – शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dasara Melava) आयोजित करण्यावरून शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलाच वाद सुरू होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. तसंच दुसरीकडे यंदा शिंदे गटाचाही मेळावा होणार आहे. त्यामुळे कोणाच्या दसरा मेळाव्याल्या किती गर्दी होणार यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. यासंदर्भात शिनसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून अतिरिक्त बस बुक करण्यात आल्या आहेत. यावरून दोन्ही गटांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. या वादावर आता शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळाव्याला आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही. झेप घेताना गरूड स्वत:ला जशी पाहिजे तशी झेप घेतो, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, मोठ्या साहेबांची म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) जेव्हा सभा व्हायची तेव्हा कष्टकरी वर्ग आणि शेतकरी वर्ग या सभेत सहभागी होण्यासाठी आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात यायचे. आदित्य ठाकरे यांच्या ज्या सभा झाल्या त्या सभेत देखील मोठ्या संख्येनं कष्टकरी समाज सहभागी झाला होता. त्यामुळे आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही.