ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिल्लक सेनेला असे मेसेज करून…”, रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमावर शिंदे गटाची खोचक टीका

मुंबई | Shinde Group On Rashmi Thackeray – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या नवरात्रीनिमित्त ठाणे येथील टेंभीनाक्याच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे आता शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (Shinde Group) आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तसंच रश्मी ठाकरे यांच्याकडून येथील देवीची आरती होणार आहे. तर शिंदे गटाकडून आरतीसाठी वेळ राखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही गटात मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी रश्मी ठाकरे यांच्या कार्यक्रमावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “अरेरे..मा. रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करून मुंबईमधून महिला गोळा करून गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे…”, अशी टीका शितल म्हात्रे यांनी केली आहे.

दरम्यान, आज (29 सप्टेंबर) दुपारी रश्मी ठाकरे यांच्याकडून 3 वाजता आरतीचा कार्यक्रम होणार असून शिंदे गटाच्या मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या नावाने वेळ आरक्षित केली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये