“मी तुमच्या मुलावर…”, सासूबाईंच्या निधनानंतर नम्रता शिरोडकरची भावनिक पोस्ट

मुंबई | Namrata Shirodkar – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं आहे. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्यांची बुधवार (28 सप्टेंबर) सकाळी 4 वाजता प्राणज्योत मालवली. महेश बाबूच्या आईच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने (Namrata Shirodkar) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
नम्रता शिरोडकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या सासूबाईंचा फोटो शेअर केला आहे. सोबत या फोटोला तिनं हटके कॅप्शन दिलं आहे. “आम्हाला तुमची खूप आठवण येईल…तुम्ही दिलेलं प्रेम आणि आठवणी आमच्याबरोबर कायम असतील. मी तुमच्या मुलावर, नातवंडांवर आणि कुटुंबावर कायम प्रेमाचा वर्षाव करेन. आई…माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम असंच अखंड राहिल”, असं नम्रता शिरोडकरने म्हटलं आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान, दरम्यान महेश बाबू यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा गारु यांनी दुसरं लग्न केलं होतं. इंदिरा देवी या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. पतीपासून विभक्त झाल्यानंतर इंदिरा देवी या एकट्याच राहत होत्या. पण महेश बाबू आणि इतर कुटुंबीय त्यांच्याकडे वारंवार जात-येत असत. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांची आई इंदिरा देवी सहभागी व्हायच्या. त्यांचं फार घट्ट नातं होतं. महेश बाबू हे कृष्णा गारु आणि इंदिरा देवी यांचे चौथे अपत्य आहेत.