ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘धनुष्यबाण’ आम्हालाच मिळावं; एकनाथ शिंदेंचं साकडं निवडणूक आयोग पुर्ण करणार?

नवी दिल्ली : (Eknath Shinde demand shivsena Symbol) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण याच्यावरच दावा केला. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात धनुष्यबाणावरुन निवडणूक आयोगासमोर न्यायालयीन लढाई सुरु झाली आहे.

दरम्यान, तोंडावर आलेल्या अंधेरी पोटनिडणूकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावं यासाठी शिंदे गटाने आयोगाकडे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करत साकडं घातलं आहे. आता शिंदेंनी घातलेलं साकडं निवडणूक आयोग पुर्ण करणार का? हे पाहणं देखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

शिंदेंचं बंड म्हणजे स्वेच्छेनं पक्ष सोडल्याची कृती. त्यामुळं त्यांच्या गटातील आमदारांकडे पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व राहिलं नसल्यानं त्यांना पक्ष चिन्ह मिळवण्याचा अधिकार नाही, अशी बाजू उद्धव ठाकरे गटानं मांडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये