पुणेसिटी अपडेट्स

विठाबाई संस्थेला जिल्हा बँकेकडून मानाची ढाल

ढाल मिळणाऱ्या संस्थेला १ लाख रुपये बक्षीस द्यावे : महारुद्र पाटील

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मौजे गंगावळण येथील विठाबाई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उल्लेखनीय कामकाज, उच्चांकी व विशेष प्रगतीमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, अप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते दुसऱ्यांदा मानाची ढाल बक्षीस देण्यात आली. विठाबाई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगावळण या संस्थेची स्थापना १९२४ मध्ये झाली. ही संस्था काही वर्षानंतर लिक्विडेशनमध्ये गेली. त्यानंतर इंदापूर तालुक्याला सहायक निबंधक म्हणून मच्छिंद्र पाटील आले. त्यांनी १९८१ मध्ये या संस्थेचे पुनरुज्जीवन केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदाच्या वर्षी शेकडो कोटी रुपयांचा नफा झालेला आहे. वि.का.से. संस्थांना प्रोत्साहन म्हणून, संस्थेला बक्षीस म्हणून ढाल देत असताना रोख स्वरूपात १ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात यावे. त्यामुळे संस्थामध्ये वसुलीसाठी स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा संस्थेला आणि बँकेला होवून, विकासाला प्रोत्साहन मिळेल.

महारुद्र पाटील,
माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका

संस्थेमध्ये तफावत पडल्याने कर्ज वाटप होत नसे. त्यासाठी कै. शंकरराव पाटील यांनी तत्कालीन चेअरमन यांना वेळोवेळी सांगून कर्ज वाटप देण्यास लावले. त्यांनतर ही संस्था प्रगतीपथावर गेली. यामधून केलेल्या प्रगतीपोटी २००७ साली संस्थेला मानाची ढाल बक्षीस म्हणून मिळाली. त्यांनतर २०२२ साली संस्था पुन्हा प्रगतीपथावर गेल्याने पुन्हा एकदा ढाल मिळाली. यंदाच्या वर्षी संस्थेने दहा टक्के डिव्हिडंट काढला आहे. यासाठी बँकचे अधिकारी पोरे यांचे संस्थेला खूप सहकार्य लाभले.
संस्थेचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी इंदापूर तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, अध्यक्ष नीलेश कन्हेरे, माजी अध्यक्ष गोरख बोंगाणे, कालिदास देवकर, अमोल भिसे, किसन जावळे, छगन तांबिले, बाळासाहेब व्यवहारे तसेच आजी माजी सर्व संचालक मंडळाने मानाची ढाल स्वीकारली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये