शिंदे-ठाकरे वाद संपता संपेना; शिंदेंची नवा नावावरही कुरघोडी सुरूच!

मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंसह 40 आमदार आणि 12 खासदारांनी साडेतीन महिन्यापुर्वी शिवसेनेविरोधात बंड पुकारून शिवसेनेवर दावा केला. तेव्हापासून सुरु झालेला शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद संपता संपना झाला आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातली लढाई निवडणूक आयोगात पोहोचली. त्यानंतर शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव गोठवल्याचे निर्देश दिले.
दरम्यान, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला नवी नावं आणि चिन्हं सादर करण्याचे आदेश दिले. आता या नव्या चिन्हांवरुन पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे, शिवसेनेने आयोगाला पाठविलेले मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही तीन चिन्हं सादर केली आहे. तर शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हं दिली आहेत. आता या दोन्हीत फक्त गदा आणि मशाल ही दोनच दोघांची वेगळी चिन्हं आहेत.
निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. आता या साम्यामुळे दोन्ही गटात नवीन वाद निर्माण होईल का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र. यातून असं दिसून येत आहे, शिंदे गटाकडून ठाकरेंना शह देण्यासाठी मुद्दान कुरघोडी करण्यात येत आहे.