ताज्या बातम्यारणधुमाळी

“बाळासाहेब ठाकरें ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नावाने…”, अमोल मिटकरींचा शिंदे गटाला टोला

बारामती | Amol Mitkari On Shinde Group – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे गटावर खोचक शब्दांत टीका केली आहे. शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं आहे. शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह तर उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे नाव मिळालं आहे. शिंदे गट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची मागणी करून चिन्हाची मागणी करत आहे. मात्र आमचं त्यांना आव्हान आहे की, बाळासाहेब ठाकरें ऐवजी नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) यांच्या नावानं चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, अशी मिश्कील टिपण्णी अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर (Shinde Group) केली आहे. ते बारामतीत बोलत होते.

पुढे अमोल मिटकरी म्हणाले, “जनसंघ, काँग्रेस या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हं बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे तेथे शिवसैनिकांचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील. मशाल हे जसं क्रांतीचं प्रतीक आहे. तसंच शिवसेनाही क्रांतीचं प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे.”

अंधेरीच्या पोटनिवडणूकीची जागा महाविकास आघाडी जिंकेल. चिन्ह जरी गोठवलं असलं तरी शिवसैनिकांचं रक्त पेटवलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि मुंबई महापालिकेत सुद्धा भगवा फडकणार, असा विश्वासही मिटकरींनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये