“…तर नीरव मोदीची हत्या होईल किंवा तो आत्महत्या तरी करेन”

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटींचा घोटळा करून विदेशात फरार झालेल्या नीरव मोदीला भारतात जीवाला धोका असल्याचं त्याच्या मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटलं आहे. निरव मोदी सध्या लंडन मधील तुरुंगात आहे. त्याच्या प्रकरणावर सीबीआय तापास करत आहे.
नीरव मोदीला भारतात प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली होती. त्यावर मोदीला भारतात पाठवणे त्याच्या जीवाला धोका निर्माण करण्यासारखे असल्याचं त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे. नीरव मोदी भारतात आर्थर जेल मध्ये राहतील. त्या तुरुंगात यापूर्वी अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. नीरव मोदी मानसिक ताण घेऊन आत्महत्या करू शकतो किंवा तुरुंगातच त्याची हत्या देखील केली जाऊ शकते असं नीरव मोदीच्या बाजूनं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, भारताच्या बाजूनं बोलताना हेलन माल्कम केसी यांनी बाजू मांडली आहे. नीरव मोदीला भारतात खासगी मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार करण्यात येतील. त्याच्यासोबत आणखी एका कैद्याला राहण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर नीरवच्या वकिलाला दररोज तर त्याच्या घरच्यांना हप्त्यातून एकदा त्याच्याशी भेटायला परवनगी दिली जाईल. त्याला ठेवण्यात येणाऱ्या खोलीतले फॅन, विजेची ठिकाणं काढून टाकण्यात येतील. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कारागृहात एक खिडकी देखील काढण्यात येईल. ज्यामधून त्याच्यावर कायम लक्ष ठेवले जाईल. असं आश्वासन बाजूनं देण्यात आलं आहे.