Top 5क्राईमताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबई
पोलिसांकडून फटाके विक्रीसाठी नियमावली

पुणे : दिवाळी सणानिमित्त दरवर्षी तात्पुरते फटाके विक्री परवाने हे लायसन्स ब्रान्च या कार्यालयाकडून देण्यात येतात. यावर्षी 12 ते 21 ऑक्टोबर या कालावधीतच फटाके विक्री करता येणार आहे. तसेच विक्री करताना व फटाके फोडताना कोणताही धोका अथवा अपघात होऊ नये, यासाठीची नियमावली पुणे पोलिसांनी जाहीर केली आहे.
लक्षात ठेवा –
हे अनिवार्य आहे!
- कागदी स्फोटक पदार्थ ठेवलेले व त्याभोवती 42.534 ग्रॅम वजनाचा 5.715 सेंटी मीटर लांबीचा 3.175 सेंटी मिटर व्यासाचा दोऱ्याने गुंडाळलेला अॅटम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादनावर जवळ बाळगणाऱ्यावर आणि विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
- 21 ऑक्टोबर नंतर म्हणजे विक्रीची मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेची दारू यांची विक्री करता येणार नाही. तसेच शिल्लक राहिलेले फटाके अथचा साठा हा परवाना असलेल्या गोदामामध्ये किंवा घाऊक परवाना धारण करणाऱ्याकडे परत करणे आवश्यक आहे.
- पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्रामध्ये कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटर अंतराचे आत कोणत्याही प्रकारची शोभेची दारू अगर कोणत्याही नावाने ओळखले जाणारे फटाके फेकणे, सोडणे, उडविणे, अगर फायर बलून किंवा अग्निवाण उडविणे ही कृत्ये करण्यास मनाई आहे.यामध्ये महामार्ग, सेतू मार्गावर नेमलेले मार्ग सेतु कमानवजा घाट धक्का किया कोणतीही आळी किंवा वाट, मग रहदारीची असो अथवा नसो याचा समावेश होतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.
- सणांच्या वेळी आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध आहेत. त्यानुसार एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे.
- जर साखळी फटाका ५० ते १०० तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उठविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत असावी. यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या तसेच 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाका उत्पादन, वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.
- ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात येत आहे. परंतु जे फटाके विविध रंग निर्माण करतात किंवा सोडतात किंवा आवाज करित नाहीत अश्या फटाक्यांवर निर्बंध नाहीत.
- तसेच शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्याचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये. शांतता प्रभागामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालचे 100 मीटरपर्यंत क्षेत्र येते.
- परवानाधारक विक्रेत्यांनी विदेशी मूळ फटाके विक्री करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत.
- ठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलकरिता परवानगी देण्यात आली आहे त्या ठिकाणी 50 मिटरच्या परिसरात संयुक्त नियंत्रक, विस्फोटके, फटाक्यांची आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तरी वरील नियमाचे काटेकोरपणे पालन करून कोणताही अपघात अथवा धोका होणार नाही याबाबत कृपया नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहान पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.