ताज्या बातम्यामनोरंजन

“भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना…”, गौरव मोरेनं शेअर केली ‘ती’ खास पोस्ट!

मुंबई | Gaurav More – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला आहे. गौरव मोरनं (Gaurav More) त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांसोबत त्याचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असतो. आता देखील गौरवनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सध्या गौरव चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त लंडनमध्ये गेला आहे. तेथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानला त्यानं भेट दिली आहे. याचा फोटो गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं “भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. कोणचे आकाश हे, तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरा गेले कुठे? या भराया आमुच्या, ही पाखरांची वंदना. तुमच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे. आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा”, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, लंडनमधील फोटो गौरवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरु शेअर केले आहेत. गौरवसह अभिनेता भरत जाधव, निखिल चव्हाण आणि माधुरी पवारही चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहेत. याआधी गौरव ‘हवाहवाई’ चित्रपटात झळकला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये