ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पोलिस प्रशासनाचा अजब कारभार! शिवसेना नेत्याच्या घरावर रात्री हल्ला, तर सकाळी सुरक्षा काढली…

चिपळून : (Nilesh Rane On Bhaskar Jadhav) शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर काल रात्री राणे समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या घराबाहेर पेट्रोलने भरलेली बाॅटली, काठ्या, दगड, स्टंप यासारख्या काही संशयास्पद वस्तू आढळल्याने याबद्दलची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी कुडाळ येथिल सभेत राणे कुटुंबावर केलेल्या टीकेतून हा वाद निर्माण झाला आहे. रात्री हा प्रकार घडला असताना सकाळी मात्र, त्यांची पोलिस प्रशासनाने सुरक्षा काढून घेतल्याचीही माहिती मिळत आहे. यामुळे पोलिसांचा अजब कारभार, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. शिवसेना नेते सातत्याने भाजप विरोधात करत असलेल्या वक्तव्यांचेच हे पडसाद असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. हा विरोधकांचा आवाज बंद करण्याचे सरकारचे प्रयत्न तर नाहीत ना? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिवसेना आणि राणे कुटुंब हा वाद काय नवा नाही. मात्र, रात्री राणे समर्थकांनी केलेला हल्ला आणि त्याचे नितेश राणे यांनी केलेले समर्थन पाहता हा वाद आता आणखी चिघळची शक्यता आहे. या हल्ल्यानंंतर शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नितेश राणे, निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये