“महाठग खिसे कापणारे…”, बच्चू कडू यांचं राणा दाम्पत्यावर टीकास्त्र

मुंबई | Bacchu Kadu On Navneet Rana And Ravi Rana – आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला आहे. ‘महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख आहे’, अशी टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात बोलताना बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.
अमरावतीत दिवाळी निमित्त खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) हे दाम्पत्य घरोघरी मोफत किराणा वाटप करत आहेत. यावर बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता खोचक शब्दांत टीका केली आहे. “खिसे कापणार आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत. तसंच महाठग आणि महा औलाद कमी आहे का? असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर टीका केली.
दरम्यान, अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात यापूर्वीही आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. तसंच बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेनंतर रवी राणा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. जिथे पैसा असतो, तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा भैय्या, सबसे बडा रूपय्या!, अशी टीका रवी राणांनी केली आहे.