पंकजा मुंडेंची नाराजी समोर! म्हणाल्या; “जे आपल्या वाट्याला येतं, त्याची चव…”

मुंबई : (Pankaja Munde’s displeasure comes to again) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षात सातत्याने डावलले जात आहे. त्यांनी अनेक वेळी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. एक मुलाखती दरम्यान पंकजा मुंडेंना तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आपली नाराजी लपवून न ठेवता खास शैलीत उत्तर दिलं आहे.
दरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या, “राजकारण कसं असतं, त्यात सर्व गोष्टींचं व्यवस्थित मिश्रण पाहिजे. जसं चहामध्ये चहापत्ती, साखर, थोडी विलायची, थोडं सुंठ किंवा आद्रक टाकली पाहिजे. कोणी दालचिनी टाकतं. ते मिश्रण परफेक्ट झालं तर चहा परफेक्ट बनतो. एखादा दुसरा पदार्थ बनवणं सोपं, पण चहा बनवणं इतकं सोपं नाही. हेच राजकारणच आहे, राजकारण आपण समजत तेवढं सोप नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान त्या म्हणाल्या, “मला स्ट्राँग चहा आवडतो. चहा चहा आहे, तो दुधासारखा कसा प्यायचा. त्यामुळे मला थोडा स्ट्राँग चहा आवडतो. जे आपल्या वाट्याला येतं त्याची चव आपल्यासारखी बदलून घ्यावी लागते,” असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.
“ताटात काही चांगलं पडलं नाही, तर मी किरकिर करत नाही. मीठ कमी असेल तर लोणचं तोंडी लावते. तिखट कमी असेल तर चटणी खाते. तसंच जीवनातही काही कमी पडलं, तर त्याची चव कशी व्यवस्थित करायची हे मला माहिती आहे,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.