ताज्या बातम्यामनोरंजन

“खरं सांगायचं तर…”, ऋतुराज गायकवाडसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर सायली संजीवचं स्पष्टीकरण

मुंबई | Sayali Sanjeev – लोकप्रिय मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ‘काही दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. तसंच तिनं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सायली संजीवनं आत्तापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ती लवकरच ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तसंच सायलीने नुकतीच ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने ऋतुराज गायकवाडसोबतच्या (Ruturaj Gaikwad) रिलेशनशिपच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसंच आयपीएलच्या सामन्यादरम्यान अनेकांनी ऋतुराजच्या खेळावरून सायलीच्या पोस्टवर कमेंट केल्या होत्या. त्यामुळे ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल त्या दोघांनी भाष्य केलं नव्हतं. याच दरम्यान सायलीनं बस बाई बस या कार्यक्रमावेळी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

बस बाई बस या कार्यक्रमात सायली संजीवसोबत अभिनेता शरद केळकरही सहभागी झाला होता. यावेळी सायलीला या कार्यक्रमातील महिलांनी ऋतुराजबद्दल प्रश्न विचारला. सायलीला ऋतुराजबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर शरदनं तिची गंमत केली. ‘जर तो तुझा मित्र असेल तर प्लीझ मला त्याच्याकडून एक बॅट हवी हा, माझ्यासाठी एक बॅट मागून घे’, असं तिला शरद गंमतीनं म्हटला. त्यावर तिने ‘मी तुम्हाला बॅट मिळवून देऊ शकते’, असं म्हटलं. तसंच ‘मी आणि तो फार चांगले मित्र आहोत’, असंही सायली म्हणाली.

“खरं सांगायचं तर आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र आहेत. त्यातील एक रॉयल चॅलेंजर बँगलोर, ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज, तुषार देशपांडे हा पण चेन्नई सुपरकिंग्ज मध्ये आहे. हे सर्वजण माझे खरंच खूप चांगले मित्र आहेत. त्यांना माझी काही दिया परदेस ही मालिका फार आवडायची. ते ती मालिका बघायचे. मला ही गोष्ट कळल्यानंतर मी जरा थक्कच झाली. क्रिकेटपटू ही मालिका का बघतात हेच मला कळत नव्हतं. एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत”, असं सायली संजीव म्हणाली.

दरम्यान, सायली आणि ऋतुराजच्या अफेअरच्या चर्चा गेल्या आयपीएलपासून रंगल्या आहेत. ऋतुराजने सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. ऋतुराजने तिच्या त्या फोटोवर वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. त्यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये