‘मुलगी झाली आलिया-रणबीरला’! पण करण जोहर का होतोय ट्रोल? कारण आलं समोर!
मुंबई : (Alia baby girl news and karan johar troll) सोशल मीडियावर जिकडे तिकडे आलिया आणि रणबीरच्या नावाचं कौतूक सुरु आहे. बॉलीवूड कमालीचं आनंदून गेलं आहे. पहिली बेटी धनाची पेटी रणबीरचं अशा शब्दांत कौतूक करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आलिया रणबीरच्या गोड बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आलियानं आपण प्रेग्नंट असल्याचे सांगून चाहत्यांना धक्का दिला होता.
नुकत्याच दोन महिन्यांपूर्वी आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाला होता. त्याला बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुन आलिया आणि रणबीरला ट्रोल देखील करण्यात आले होते. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय तर करण जोहर हा ट्रोल होतो आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळया प्रतिक्रिया देत, पोस्ट शेयर करुन त्याला ट्रोल केले गेले आहे.
यामुळे अनेकांना एक प्रश्न पडला आहे की, करण जोहर का ट्रोल होतोय. त्याचा फोटो दाखवून पाळण्यातील आलियाच्या बाळाचा फोटो दाखवत तू मोठेपणी अभिनेत्री होणार असे वाक्य करण जोहरच्या तोंडी घालण्यात आले आहे, सोशल मीडियावर करण जोहरचे वेगवेगळे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आलियाची गोड बातमी ऐकल्यानंतर करणनं तातडीनं रुग्णालयात धाव घेतली असून तो आलियाच्या मुलीली स्टुडंट ऑफ द इयरच्या आठव्या पार्टसाठी साईन करणार असल्याच्या मीम्सही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यावरुन अनेकांनी करणला ट्रोल केले आहे.