ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की…”, ठाकरे गटाचा गजानन किर्तीकरांवर पहिला टिकेचा बाण!

मुंबई : (Arvind Sawant On Gajanan Kirtikar) खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी किर्तीकरांवर खोचक टीका केली आहे. मला ज्युनिअर म्हणता, मग आत्ता ज्यांच्या नेतृत्वाखाली गेलात, ते तर किती ज्युनिअर आहेत? असाही सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. २०१९ला एनडीए सोबत असताना मिळालेलं मंत्रीपद अरविंद सावंत यांना दिलं गेलं. तेव्हा ज्येष्ठ शिवसेना नेता गजानन किर्तीकर का लक्षात आला नाही? असा सवालही किर्तीकर यांनी केला.

यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून आता खुद्द अरविंद सावंत यांनीच गजानन किर्तीकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “१९६६चा मी शिवसैनिक आहे. १९६८चा मी गटप्रमुख होतो. चंद्रकांत खैरेंनी निवडणूक लढवली, तेव्हा आम्ही त्यांच्या प्रचारात अग्रणी होतो.आम्ही कुठेच आमदार वगैरे नाही झालो. किर्तीकर नगरसेवक झाले, आमदार झाले, मंत्री झाले. लोकाधिकारच्या चळवळीतही सुरुवातीपासून होतो. माझा भाऊ किर्तीकरांसोबत काम करत होता. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की चार वेळा आमदारपद, दोनदा खासदारपद मिळालं. नंतर तुम्ही राज्यमंत्रीही झाला होता. सगळं कसं एका क्षणात विसरलात?” असा सवाल अरविंद सावंत यांनी किर्तीकरांना केला आहे.

“शिवसेनेत वरीष्ठ-कनिष्ठ असा वाद कधीच नव्हता. शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश वंदनीय असतो. आता ते ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले आहेत, ते तर किती ज्युनिअर-ज्युनिअर आहेत. मग त्यांचं नेतृत्व स्वीकारणाऱ्यांना असं म्हणण्याचा कुठला अधिकार आहे? एक मिंधा दुसऱ्या मिंध्याला मिळाला. आयुष्याचा सूर्य पश्चिमेला मावळत असताना आपल्याला कळायला पाहिजे की मावळताना तरी किमान स्वाभिमानाने जावं. आम्हाला सगळ्यांना वाटतं की भगवा घेऊनच वर जावं”, असंही अरविंद सावंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये