शिंदे गटाची मोठी खेळी! शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात; काय म्हणतात अंधारे?

मुंबई : (Sushama Andhare And vaijanath Waghmare) शिवसेनेत फुट पडल्यापासून शिंदे गटाकडून (Eknath shinde) मोठमोठे डाव ठाकरे गटावर (Uddhav Thackerey) फेकले जात आहेत. त्यामुळे राज्यातील फोडाफोडीचे राजकारण टोकाला गेल्याचं दिसत आहे. अजूनही अनेक कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होताना दिसत आहेत. शिंदे गटाकडे सध्या सत्ता आहे. (Shinde Fadanvis Government) त्याचबरोबर लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका (Municipal Corporation Elections) तोंडावार येऊन ठेपल्या आहेत. त्यात अनेक कार्यकर्त्यांना शिंदेंच्या सत्तेचा फायदा होईल आणि सत्तेत येण्याची संधी मिळेल. या आशेने अनेक कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, शिवसेनेतील सुषमा अंधारे यांचे विभक्त पती आता शिंदे गटात सहभागी झाल्याची माहिती आहे. (Susham Andhare Husband Joins Eknath Shindes Shivsena)
शिवसेनेत फुट पडल्यानंतर काही दिवसांनी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Susham Andhare) यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. सुषमा अंधारे (Susham Andhare) यांचा अभ्यास आणि वत्कृत्व चांगलं असल्यानं त्यांचा शिवसेनेला मोठा फायदा देखील होताना दिसत आहे. शिवसेनेच्या फायरब्रांड नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. मात्र, शिंदे गटाकडून आता मोठा फासा ठाकरे गटावर टाकल्याचं दिसत आहे. सुषमा अंधारे यांच्या पतीला शिंदे गटात प्रवेश देण्यात आला आहे.
सुषमा अंधारे (Susham Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे अडसरकर हे रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. टेंभी नाका येथील आनंद मठात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटाकडून खेळण्यात आलेल्या या राजकीय खेळीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “प्रत्येकाला काय करायचं याचं स्वातंत्र्य आहे. आम्ही ४-५ वर्षांपासून विभक्त आहोत. ते एवढ्या दिवस कुठे होते हे देखील मला माहिती नाही. मी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देईल. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही.” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.