“असंच सुरु राहिलं तर काही दिवसांनी उद्धव ठाकरेंसोबत चौघंजनंच असतील”

मुंबई : (Maharashtra Politics) शिवसेनेत (shivsena) फुट पडल्यापासून अनेक कार्यकर्ते शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश करताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून कट्टर शिवसैनिक म्हणवून घेणारे नेते देखील शिंदे गटात गेले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांसारख्या नेत्यांनी देखील प्रवेश केले आहेत. मात्र, ठाकरे गटाला गळती लागलेलीच आहे. सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे (Vaijanath Waghmare) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपच्या मोठ्या नेत्याने ठाकरे गटात काही दिवसांनी चारच लोक असतील असं भाकीत केलं आहे. (Sushama Andhare Husband Vaijanath Waghmare Eknathi Shindes Group)
सुषमा अंधारे यांच्या पतींनी शिंदे गटात र्पवेश केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर टोला लगावला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारधारेने चालत आहेत. त्यामुळे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ते पाहता, भविष्यात त्यांच्या व्यासपीठावर चौघेच बसण्याची शक्यता आहे.” चंद्रशेखर बावनकुळे सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांची सात म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचा प्रकार आहे. हे आम्ही उद्धव ठाकरेंना अनेकदा सांगत देखील होतो. तयंनी ते ऐकलं नाही आणि आज त्यांच्यावर ही परिस्थिती आहे.” असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.