क्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकचं खळबळजनक ट्विट; म्हणाला…

मुंबई | Sania Mirza Birthday – गेल्या काही दिवसांपासून भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाची (Divorce) चर्चा सुरू होती. त्या दोघांमध्ये काहीही आलबेल नसल्यानं ते दोघे वेगळे राहत असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असल्याचा दावाही शोएबच्या जवळच्या व्यक्तीनं केला होता. मात्र यावर सानिया-शोएबनं अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. यादरम्यान, शोएबनं सानियासाठी एक ट्विट केलं असून हे ट्विट सध्या चांगलं चर्चेत आहे.

सानियाचा आज (15 नोव्हेंबर) 36वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त शोएबनं शेअर केलेली एक पोस्ट लक्षवेधी ठरतेय. सानियाला तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये तिचा पती शोएबनं देखील एक फोटो शेअर करत सानियाला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

“सानिया मिर्झा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा! खास दिवसाचा पुरेपूर आनंद घे”, असं ट्विट शोएबनं केलं आहे. या ट्विटनंतर शोएब आणि सानिया यांचा घटस्फोट नक्की होणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

https://twitter.com/realshoaibmalik/status/1592239442349420544

दरम्यान, सानिया आणि शोएब लवकरच पाकिस्तानमधील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफाॅर्म उर्दूफ्लिक्सवर एका शोसाठी एकत्र येणार आहेत. “मिर्झा मलिक शो लवकरच फक्त उर्दूफ्लिक्सवर”, असं या ओटीटी प्लॅटफाॅर्मनं एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये