ताज्या बातम्यारणधुमाळी

“पणजोबाच्या पुण्याईवर जगणारे दोन निरूपयोगी…”, चित्रा वाघ यांचा राहुल गांधी, तुषार गांधींना खोचक टोला

मुंबई | Chitra Wagh On Rahul Gandhi, Tushar Gandhi – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी (Savarkar) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी एका सभेत सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान केलं होतं. त्यावरून भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसंच महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी राहुल गांधींचं समर्थन केलं आहे. त्यामुळे भाजपकडून (BJP) त्यांच्यावरही हल्लाबोल करण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले तुषार गांधी?

तुषार गांधी शुक्रवारी (18 नोव्हेंबर) राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या विधानाला समर्थन दिलं. “राहुल गांधींनी जे सत्य आहे ते सांगितलं आहे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफी मागितली होती. इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती. जर आपण सत्य सांगायला घाबरलो तर आपण सत्याशी दगाबाजी करतो”, असं तुषार गांधी यांनी म्हटलं होतं.

पुढे तुषार गांधी म्हणाले, “राहुल गांधींनी माडलेलं मत अगदी योग्य आहे. सावरकर एकेकाळी क्रांतीकारी होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. पूर्ण आयुष्य ते इंग्रजांशी इमानदार राहिले. हे आपण सांगण्यात काहीच चुकीचं नाही. सत्य सांगायचं धाडस असायलाच हवं. ते कुणी सांगत नसतील तर ते सत्याला घाबरतात हे स्पष्ट दिसतं. ज्यांना सत्य माहिती आहे त्यांनी जर सत्य लपवलं तर सत्याशी त्यांची निष्ठा नाहीये हे कळून येतं.”

दरम्यान, यासंदर्भात भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राहुल गांधी आणि तुषार गांधीवर खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आपापल्या पणजोबाच्या पुण्याईवर जगणारे, देशासाठी 2 निरूपयोगी जीव…अहो रूपम् अहो ध्वनीम्…” तसंच चित्रा वाघ यांनी संबंधित वृत्ताचा स्क्रीनशाॅटदेखील ट्विट केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये