ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांचा सवाल, म्हणाले; “महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे, आता…”

मुंबई : (Sanjay Raut On Eknath Shinde) काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे राजकारण आणखीनच तीव्र होताना दिसत आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. राऊत म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत गेलो, म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि म्हणून तुम्ही पक्ष सोडला. राज्यपालाने अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. तर शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं आहे, तरीही तुम्ही सत्तेला चिकटून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे.

याआधी राज्यापालांनी थोर पुरुषांचा चार-पाच वेळा अपमान केला आहे. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. तरीही हे सरकार गप्प आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह हे शिवाजी महाराजांना आदर्श मानतात, महाराष्ट्रात येऊन जयजयकार करतात आणि दुसरीकडे त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते हे शिवाजी महाराजांना माफीवीर म्हणतात. ही भाजपची अधिकृत आहे का? असं स्पष्ट करावं अन्यथा राज्यपालांना हद्दपार करुन जाहीर माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

“मला आश्चर्य वाटतंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी स्वाभिमानाचा नारा देत शिवसेना तोडली आणि भाजपसोबत सरकार बनवलं. भाजप शिवाजी महाराजांचा उघडपणे अपमान करते आहे, आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? तुम्ही राजीनामा द्या. अशा सरकारमध्ये तुम्ही का राहत आहात?, तुम्हाला खरोखरच शिवाजी महाराजांबाबत थोडा जरी स्वाभिमान असेल, मग तुम्ही सरकारमध्ये का बसला आहात?” असा सवालही संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये