क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशने जामीन अर्ज मागे घेतला; प्रकरणाला मिळणार नवा वळण?

मुंबई : (Anil Deshmukh Son’s Rishikesh Bail application withdrawn) मागील वर्षी महाविकास सरकारच्या काळात फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडीचे धागेदोरे मुंबई पोलिसांतले अधिकारी सचिन वाझे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि थेट तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोचले.

त्यानंतर अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला. त्यामुळे देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना अटक करण्यात आली. ते मागील जवळपास वर्ष-दीडवर्षापासून कारागृहात आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांच्यावर ईडी, सीबीआयने कारवाई केली आहे. अनेकदा त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आलेला आहे. याच प्रकरणात आता एक नवा ट्वीस्ट आला आहे.

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यांचंही नाव या प्रकरणात आरोपी म्हणून आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आता ऋषिकेश यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये