“तुमच्या अंतर्गत गटबाजीमुळे आपण चांगली माणसं गमावतोय”; उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली खंत

मुंबई : (Uddhav Thackerey News) शिवसेनेत फुट (maharashtra political crisis) पडल्यापासून ठाकरे गटाला लागलेली गळती कायम आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश करत आहेत. मात्र, ही गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसैनिकांना विश्वासात घेण्यासाठी त्यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. दरम्यान, त्यांनी मुंबईत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. (Uddav Thackerey)
“तुमच्या आपापसातल्या स्पर्धेमुळे आणि अंतर्गत गटबाजीमुळे आपण चांगली माणसं गमावतोय.” अशी खंत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर केली आहे. अशी गटबाजी पक्षाला घटक आहे. पक्षाला उभारी देण्याचं काम आता सुरु झालंय आणि अशा काळात महिला पदाधिकाऱ्यांतील अंतर्गत स्पर्धा धोकादायक आहे. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधीकाऱ्यांचे कान टोचले आहेत.
ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे पक्षात अंतर्गत राजकारण वाढलं आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे. शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामागे अंतर्गत स्पर्धा आणि गटबाजी तर कारण नाही ना अशी शंका निर्माण होत आहे.