Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“राज्यपालांच्या महाराजांवरील वक्तव्यावर पवार साहेब आणि गडकरी साहेबांनी त्याचवेळी निषेध का केला नाही?”; उदयनराजेंचा सवाल

मुंबई : (Udayanraje Bhosale Press Conference) महाराष्ट्राचे राज्यपाल भागातसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्याने अवघ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. याधीही राज्यपालांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. विरोधकांकडून राज्यपालांच्या (Mahavikas Aghadi) राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यपालांच्या बदलीसाठी केंद्रात (Centra Government) पत्र पाठवले आहेत. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी देखील पत्राद्वारे राज्यपालांच्या बदलीची मागणी केली आहे. दरम्यान, आज उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. (Udayanraje Bhosale Press Conference On BhagatSingh Koshyari’s Statement Over Chhatarpati Shivaji Maharaj)

पत्रकार परिषदेत त्यांनी निष्पक्ष भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. राज्यपालांची बदली केली नाही, तर मी पक्ष वगैरेचा विचार करणार नाही. २८ तारखेपर्यंत वाट बघत आहोत. त्यानंतर पक्षाबद्दलची मी माझी भूमिका स्पष्ट करेन. असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं आहे.

पवार आणि गडकरींनी राज्यपालांचा निषेद का केला नाही?
पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केला आहे. “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यातील जेष्ठ नेते शरद पवार हे एकाच व्यासपीठावर होते. त्याचवेळी राज्यपालांनी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. तेव्हा शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी त्यांना सांगायला पाहिये होतं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करायला पाहिजे होता. त्यांनी तसं का केलं नाही?” असा सवाल उदयनराजेंनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये