‘आदिपुरुष’ ते ‘द कश्मीर फाइल्स’; ‘हे’ हिट सिनेमे वादाच्या भोवऱ्यात!

मुंबई : कोरोनाकाळानंतर मनोरंजनसृष्टी पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. ओटीटी प्लॅटफॉर्मचा दबदबा असतानाही अनेक सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले. अनेक बिग बजेट सिनेमे या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
लाल सिंह चड्ढा– आमिर खान आणि करीना कपूर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा या वर्षातला फ्लॉप सिनेमा ठरला आहे. या सिनेमाला बॉयकॉट करण्यात आले होते. याचाच परिणाम थेट सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला.
द कश्मीर फाइल्स’ – या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण विवेक अग्निहोत्रींचा हा सिनेमा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकला. आजही या सिनेमावर टीका केली जात आहे. हा सिनेमा नव्वदच्या दशकात काश्मीक खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करणारा आहे.
आदिपुरुष – या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रभास आणि सैफच्या लूकला प्रचंड ट्रोल केलं. या सिनेमाच्या व्हीएफक्सवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.